Aptoide कुकीज धोरण

कुकी म्हणजे काय आणि Aptoide ते कसे वापरते

कुकी ही एक छोटी टेक्स्ट फाइल असते जी भेट दिलेल्या वेबसाइटवरुन वापरकर्त्यांच्या ब्राऊझरमध्ये पाठविली जाते. Aptoide कुकीला वापरकर्त्याच्या कंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसमध्ये साठविते ज्यामुळे वापराचा अनुभव समृद्ध होतो. ह्यामुळे Aptoide वापरकर्त्याच्या प्राधान्यांना पुढच्या भेटीसाठी लक्षात ठेवतो, ज्यामुळे वेबसाइटची कार्यक्षमता वाढते. कुकीजच्या साठवणीने, वापरकर्त्याला वारंवार माहिती द्यावी लागत नाही.

उदा. Aptoide कुकीजचा वापर वापरकर्त्याची भाषा किंवा पानाला भेट दिल्याची संख्या लक्षात ठेवण्यासाठी करतात.

आपल्या ब्राऊझर सेटिंग्जमधुन आपण कुकीजच्या वापरास ब्लॉक करु शकता. पण ह्यामुळे वेबसाइटच्या अनुभवात असमाधान निर्माण होऊ शकते.

Aptoide द्वारा वापरण्यात येणार्‍या कुकीजचे प्रकार

जाहिराती आम्ही जाहिरातीच्या कुकीज जसे कि गुगल सेवांमधुन प्राधान्य किंवा एनआयडी वापरुन जाहिरातींची पसंती शोध कार्यात वापरतो. ह्या प्रकारे, दाखविल्या जाणार्‍या जाहिराती वापरकर्त्याला जास्त आकर्षक दिसतात.

विश्र्लेषण: विश्र्लेषण कुकीजचा वापर आम्हास वेबसाइटला भेट देणार्‍यांविषयीची माहिती सांख्यिकी कारणासाठी वापरण्यास मदत करतो, ज्यामुळे आमच्या व्यवसायाचे मूल्यवर्धन होते (उदा.: कोणत्या देशातुन जास्त भेट दिली जाते? आमच्या वापरकर्त्यांचे सरसरी वय काय?).

प्राधान्य: ह्या प्रकारच्या कुकींसाठी आम्ही वापरकर्त्याचे प्राधान्य जसे कि भाषा किंवा वापरकर्त्याने पाहिलेल्या बातमीपेक्षा वेगळी बातमी. उदा. एकदा का वापरकर्त्याने त्यांची भाषा सेट केली, कि मग त्याच कंप्युटर किंवा डिव्हाइवरुन पुढच्या सगळ्या भेटींच्या वेळी ती तीच राहील.

सेशन: ह्या प्रकारच्या कुकीज वापरकर्त्याने ब्राऊझर बंद करेपर्यंतच उपलब्ध असतात, ज्यामुळे प्रवेश आणि माहितीची देवाण घेवाण होऊ शकते.

तृतीय पक्ष: ह्या कुकीज तृतीय पक्षीय सेवांकडुन जसे कि गुगल, यूट्यूब, फेसबुक किंवा ट्वीटर कडुन निर्माण होतात आणि जाहिरातीसारख्या सेवांची कार्यक्षमता तपासण्यासाठी वापरल्या जातात.

कुकीजचे व्यवस्थापन कसे करायचे

सगळे ब्राऊझर वापरकर्त्यांना ठराविक कुकीज मान्य, नकारण्यास किंवा मिटविण्यासाठी ब्राऊझर डेफिनिशन्सद्वारे परवानगी देतात.

मागे